आज क्षणा क्षणाला बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने जग पूर्णपणे बदलून टाकले आहे. INTERNET OF THINGS, ARTIFICIAL INTELLIGENCE, VIRTUAL REALITY, THREE D PRINTING या सर्वांमुळे उद्योगाच्या उद्योग उद्वस्त होत चालले आहेत. नोकऱ्यांची परिस्थिती त्याहून भयानक आहे. कारण नोकरी करणारी व्यक्ती फक्त एकच काम करण्यात हुशार असते व एखादी इंडस्ट्रीच पूर्णपणे उधवस्त झाली तर त्यांना घरी बसून राहावे लागते.
INTERNET OF THINGS, ARTIFICIAL INTELLIGENCE, VIRTUAL REALITY, 3D PRINTING
मी जेव्हा उपस्थित उद्योजकांना INTERNET OF THINGS, ARTIFICIAL INTELLIGENCE, VIRTUAL REALITY, THREE D PRINTING या सर्वांबद्दल विचारले तेव्हा ५०० लोकांमधून फक्त २-४ हातच वर आले. इतरांना या तंत्रज्ञाना बद्दल काहीच माहित नाही.
टाटा टेलिसर्व्हिसेस व रिलायन्स कम्युनिकेशन्स बंद झाल्याने त्या कंपन्यांमध्ये काम करणारे सर्व बेरोजगार होतील. काही कमी पगाराची जमेल ती नोकरी करतील. आयुष्यात तडजोडी करत पुढचे आयुष्य जगावे लागणार
हिच वेळ आहे बदलत्या तंत्रज्ञानावर आरूढ होण्याची जगाचे नेतृत्व करण्याची भारताला महासत्ता बनविण्याची !
दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने ‘इंटरनेट टेलिफोनी’ला जी मंजुरी दिली आहे त्यामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येणार आहेत.
जगात सर्वात महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे संदेशवहन — संपर्क यंत्रणा ! संपर्क यंत्रणा जितकी मजबूत प्रगती तितकीच वेगात !
आज अनेक देश बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून मोठे होत आहेत. जे देश जगाच्या नकाशात कुठे आहेत हे माहित नव्हते असे देश बदलत्या तंत्रज्ञानावर स्वार होऊन जगाचे प्रतिनिधित्व करीत आहेत आणि भारत देश आणि भारतीय नागरिक या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत.